Posts

मा. यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली

यशवंतराव चव्हाण यांचे विचार समाजासाठी आदर्शवत प्रा. डॉ.खानापुरे  महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आदरणीय यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्रासाठी आदर्श असेच होते त्यांचे विचार आचार हे समाजाच्या उद्धाराचे होते. मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीचे घेतलेले निर्णय कौतुकास्पद आहेत म्हणूनच महाराष्ट्र आज भारतात प्रथम क्रमांकावर आदर्श राज्य म्हणून ओळखले जाते. असे दूधसाखर महाविद्यालयाचे न्याक समन्वयक डॉ. खानापुरे यांनी व्यक्त केले. निमित्त होते दूध साखर महाविद्यालयात आयोजित केलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीचे. यावेळी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन  समन्वयक डॉ.खानापूर व सहसमन्वयक डॉ. एन एम पाटील सर यांनी केले. कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन प्रा. ए बी माने, प्रास्ताविक प्रा. किशोर पाटील यांनी केले, तर उपस्थित आमचे आभार प्रा गौतम कांबळे यांनी मांडले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .संजय पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक कर्मचारी वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.